सोलापूर – मौजे किणी ता. अक्कलकोट या ठिकाणी रात्रीच्या वेळी बंद घराचे कुलूप तोडुन कडी कोयंडा उचकटुन अज्ञात चोराने घरफोडी करुन सोन्या चांदीचे दागिने असे एकुण 3,14,750/- रुपये किंमतीचे ऐवज चोरी केले होते. सदर बाबत तक्रारदार याने अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता.
पोलीस अधीक्षक, आणि अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, यांनी घरफोडी करणारे आरोपीचे शोध लावुन गुन्हा उघड करणेबाबत पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांना आदेशीत केले होते. सदर आदेशाच्या अनुषंगाने सुरेश निंबाळकर स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पो.उप.नि. सुरज निंबाळकर, राजु डांगे आणि पथकातील अंमलदार यांना गुन्हे उघड करणेबाबत आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचे शोध घेणेकामी आदेशीत केले.
पो.उप.नि. सुरज निंबाळकर, राजु डांगे आणि पथकातील अंमलदार अक्कलकोट उपविभागात मालाविषयी गुन्हयाचे तपासाकामी पेट्रॉलिग करीत असताना, पो.हे.कों. रवि माने यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे गुन्हयातील आरोपी हा एका मोटार सायकलवर अक्कलकोट बस स्थानकावर येणार आहे. सदर बातमी प्रमाणे पो.उप.नि. सुरज निंबाळकर, राजु डांगे आणि पथकातील अंमलदार नमुद बातमीच्या ठिकाणी सापळा रचुन नमुद वर्णनाच्या आरोपी मोटार सायकलवरुन येताच त्यास ताब्यात घेतले, आरोपीतास अधीक विश्वासात घेवुन विचारपुस केली असता वरील नमुद गुन्हा त्याने त्याचे अन्य चार साथीदारा समावेत केल्याची कबुली दिली, ताब्यात घेतलेली आरोपी याचेकडे मोटार सायकल बाबत विचारपुस करता सदर मोटार सायकल त्याचे साथीदार याने चोरुन मला वापरण्यास दिली असे सांगितले, तसेच चार साथीदारा समवेत मोटार सायकल वरुन येवून खालील घराफोडीचे गुन्हे केल्याचे कबुली दिली आहे. नमुद आरोपीस अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे करीत आहेत.
वरील सर्व गुन्हयातील चोरीस गेलेला माल अटक आरोपी याचेकडुन एकुण 40 ग्रॅम सोन्याचे दागिने, 3 मोटार सायकल, 1 मोबाईल हॅन्डसेट असा एकुण 3,80,000/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद अटक आरोपी याचे साथीदार यांचे गुन्हे अभीलेख पाहता त्याचेवर लातुर, धाराशीव, तसेच कर्नाटक राज्यात गुन्हे दाखल आहेत.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...