सोलापूर – राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार काल सायंकाळच्या सुमारास सोलापुरात आगमन झाले, कारण म्हणजे शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते मनोहर सपाटे यांचे चिरंजीवचे लग्न होते, ही माहिती सोलापुरातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना मिळताच सोलापूर शहर जिल्ह्यातील व तसेच महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सोलापुरात दाखल झाले आणि शरद पवार यांची एक झलक पाहण्यासाठी तुडुंब गर्दी केली, शरद पवार येताच कार्यकर्त्यांचा एकच आवाज घुमला ते म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार या घोषणेने संपूर्ण परिसरात दुमदुमलं होते दरम्यान लग्नात आटवून शरद पवार हे मुक्कामासाठी आसरा येथील बालाजी सरोवर मध्ये होते, दरम्यान आज सकाळी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नगरसेवक तोफिक पैलवान आणि अबबकर सय्यद हे यांसह ताज सुशील ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती दरम्यान यावेळ शहराध्यक्ष भारत जाधव, राष्ट्रवादी पक्षाचे निरीक्षक शेखर माने यांनी नगरसेवक तोफिक पैलवान यांचा वाढदिवस नुकतेच संपन्न झाल्याचे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना सांगितले व शरद पवार यांनी नगरसेवक तोफिक पैलवान यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा दिल्या