सोलापूर – फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सोलापूर शहर आणि इतर जिल्ह्यातून चोरीस गेलेल्या १५ मोटरसायकल आणि १० मोबाईल हँडसेटसह चोरट्याला अटक करून एकूण सहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत हकीकत अशी की बांधकाम कामासाठी मजूर म्हणून कामास आलेल्या कामगारांनी मालकाची HF डिलक्स मोटरसायकल काम आहे जाऊन येतो म्हणून चोरून नेहली, अशी फिर्याद फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे श्रीपाद दिलीप कंदलगावकर (वय 28 राहणार मड्डी वस्ती तुळजापूर नाका भवानी पेठ, सोलापूर) यांनी 14 एप्रिल 2023 रोजी दिली होती. सदर प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे 379 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यातील चोरट्याचा शोध घेत असताना फौजदार चावडी पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी चोरलेली मोटरसायकल आणि मोबाईल विक्रीसाठी जीएम चौक येथे येणार आहे, त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपी अविनाश गोपाळ आसबे (वय 22 मु.पो. दहिटणे समर्थ लॉन्ड्री समोर, लक्ष्मी नगर सोलापूर) यास ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यातील मोटरसायकल आणि त्याच्या खांद्यास अडकविलेल्या बॅगेतून 10 मोबाईल जप्त केले. सदर आरोपीची कसून चौकशी केली असता त्यांनी विविध ठिकाणावरून 15 मोटरसायकल आणि दहा मोबाईल चोरी केली असल्याचे कुबूल केले. याबाबतची अधिक माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ही विशेष कामगिरी पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, आणि त्यांच्या पथकातील धनंजय बाबर, संतोष चांकोटी, दीपक डोके, अजय चव्हाण, आयाज बागलकोटे, विनोद व्हटकर, अर्जुन गायकवाड, नितीन मोरे, सचिन कुमार लवटे, नागनाथ गुळवे, चौगुले, कृष्णा बडूरे यांनी पार पाडली
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...