सोलापूर – गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या एका चोराला अटक करून, त्याच्याकडून चार दुचाकी जप्त केले. रमजान ऊर्फ चाचा बादशाह नदाफ (रा. मडकी वस्ती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एकूण चार आणि अन्य दोन चोरांना अटक करून त्यांच्याकडून एक दुचाकी जप्त केली आहे.
चोरीच्या गुन्ह्यातील एक आरोपी किडवाई चौकात बसल्याची माहिती गुन्हे शाखेच्या स.पो.नि. महाडिक यांच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी आरोपी रमजान ऊर्फ चाचा, बादशाह नदाफ याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केल्यानंतर त्याने सहकार्याच्या मदतीने चार दुचाकी चोरल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील ३ आणि जेलरोड पोलिस ठाणे हद्दीतील १ असे एकूण चार दुचाकी जप्त करण्यात आले.
शिवाय गुन्हे शाखेतील स.पो.नि. दादासाहेब मोरे यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी ऋषिकेश युवराज शिंदे (वय २२, रा. कुमठे गाव), सचिन परमेश्वर म्हेत्रे (वय २३, रा. कुमठे गाव) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीतील एक दुचाकी जप्त केली. अशा प्रकारे एकूण ३ आरोपींकडून १ लाखाचे पाच मोटारसायकल पोलिसांनी जप्त केले.
सदरची कारवाई गुन्हे शाखेचे पो.नि. सुनील दोरगे, स.पो.नि. श्रीनाथ महाडिक, स.पो.नि. दादासाहेब मोरे, वाजिद पटेल, अंकुश भोसले, संतोष मोरे, अनिल जाधव, योगेश बर्डे, शैलेश बुगड़, संजय साळुंखे, राजकुमार वाघमारे, अभिजीत धायगुडे, इम्रान जमादार, विनोद रजपूत, प्रकाश गायकवाड, वसीम शेख, सतीश काटे, बाळू काळे यांनी पार पाडली.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...