सोलापूर – दरवर्षी राज्यातून हजारो मुस्लीम यात्रेकरू हज करण्यासाठी सउदी अरेबिया (मक्काह) येथे जातात, सोलापुरातून यंदाच्या वर्षी ७०० यात्रेकरू या पवित्र यात्रेला जाणार असून जूनमध्ये मुंबईतून त्यांच्या विमानाचे उड्डाण होणार आहे.
इस्लाममध्ये हज यात्रेला अतिशय महत्व असून, ही यात्रा शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडली जाते, यात्रेतील सर्व विधी पूर्ण करणे बंधनकारक आहे.
हज यात्रेसाठी मक्का आणि मदिना शहरात दरवर्षी मोठी तयारी केली जाते, सउदी प्रशासनातील अधिकारी यात्रेकरूच्या सोयीसाठी दिवस-रात्र सज्ज असतात, या यात्रेसाठी तेथील प्रशासनाकडून प्रत्येक देशाला कोटा दिला जातो, तितक्याच संख्येने भाविक यात्रेसाठी जाऊ शकतात.
वर्षातून एकदाच ही यात्रा पार पडते, ७ जूनपासून मुंबई विमानतळावरून हज यात्रेकरू हजसाठी रवाना होत आहेत, सोलापुरातील बांधव हे १०, ११ किंवा १२ जूनला मुंबईतून विमानाने हज यात्रेसाठी उड्डाण करतील, यात्रेकरुच्या सोयीसाठी येथील हज समितीही त्यांना विविध प्रकारची मदत करते.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...