सोलापूर – राहत्या घरात तरुणाने सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली, संदीप शांतमलप्पा इंगळे (वय ३०, रा. होटगी स्टेशन, दक्षिण सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.
मृत संदीप याने राहत्या घरातील सिलिंग फॅनला शुक्रवारी दुपारच्या सुमारास गळफास घेतले. ही घटना त्यांच्या कुटुंबियांना लक्षात आल्यानंतर त्याच्या गळ्या भोवतालचा कास काढून त्याला खाली उतरवून उपचारासाठी छत्रपती शीवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालय सोलापूर येथे दाख करण्यात आला, दरम्यान, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत करण्यात आली आहे.
आत्महत्येचा कारण अद्याप स्पष्ट नाही, पोलिसांकडून पुढील तपास घेतला जात आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...