सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमिरवणुकी निमित्त शहरात एकीकडे जल्लोष सुरु असताना, त्याच वेळी हुतात्मा चौकात रात्री ११ वाजता एका तरुणावर कोयत्यानं वार करुन खुनी हल्ला झाल्याची घटना घडली आहे, केतन विजय माने (वय २३, रा. हत्तुरे वस्ती, विमानतळ, सोलापूर) असे हल्ला झालेल्या युवकाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, यातील जखमी केतन माने हा तरुण हुतात्मा चौकात थांबलेला होता, मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या लोकांची हुतात्मा चौकात रहदारी होती, यावेळी काही कारण नसताना ऋषी हराळे, प्रवीण हराळे, विशाल खिलारी, समर्थ जाधव या चौघांनी कोयत्यानं केतनवर वार केला, अशी सिव्हील चौकीतील एमएलसी रजिस्टरला नोंद झाली आहे, यात त्याच्या डोक्याला मार लागून त्याचं डोकं रक्तबंबाळ झाले. तातडीने त्याला त्याचा भाऊ शुभम याने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
पार्क चौकात ही घटना घडताच नेमके काय झाले याची कोणालाच कल्पना नसल्यामुळे खून झाल्याची अफवा पसरली, जखमी केतनला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर शासकीय रुग्णालयात एकच गर्दी झाली होती, नेमका प्रकार कशामुळे घडला याचा पोलीस शोध घेत आहेत.
एनटीपीसी सोलापूरच्या वतीने जिल्हा परिषद मराठी शाळा, होटगी स्टेशन येथे नवीन वर्गखोल्यांचे उद्घाटन
सोलापूर - एनटीपीसी सोलापूरने आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) प्रयत्नांचा एक भाग म्हणून होटगी स्टेशन येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत...