सोलापूर – सिद्धेश्वर मंदिराच्या तलावातील पाण्यात एक महिला पाण्यात तरंगताना आढळली, ही घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली, लक्ष्मी मधुसूदन कोंगारी (वय ४३, रा. राघवेंद्र नगर, एमआयडीसी) असे मृत महिलेचे नाव आहे.
रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मृत लक्ष्मी कोंगारी या मंदिर तलावातील पाण्यात बेशुद्ध अवस्थेत तरंगताना आढळल्या, ही माहिती नागरिकांनी पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी त्यांना बाहेर काढले, त्यानंतर त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार (सिव्हिल हॉस्पिटल) रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, याचा पुढील तपास फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे अधिकारी करत आहेत, या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे करण्यात आली आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...