सोलापूर – अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे गुरनं जून 1992 साली दाखल गुन्ह्या प्रमाणे, सदर गुन्हयात आरोपीत यांनी दोन महिला आणि तीन मुलांना जिवे ठार मारले होते. नमुद गुन्हयात सत्र न्यायालय सोलापूर यांनी दि. 15/12/1994 रोजी आरोपीत यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती.
यातील आरोपीत यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे सदर शिक्षे विरोधात अपिल केले होते, उच्च न्यायालय मुंबई यांनी सदर अपिल दिनांक 18/05/2005 रोजी फेटाळले होते, तेव्हा पासुन आरोपी गायब झाला होता, सत्र न्यायालय सोलापूर यांनी सदर आरोपी यास पकडणे बाबत स्थायी वॉरंट काढले होते. नमुद गुन्हयाची तीव्रता लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सदर स्थायी वॉरंट बजावणीसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांना आदेशीत केले होते.
सदर आरोपी हा रेकॉर्ड वरील आरोपी असुन त्याचे विरुध्द खुन, दरोडा, खुनासह दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, फसवणुक सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे गुरनं जून1992 भादंवि क 302, वगैरे या पाच जणाच्या खुनांच्या गुन्हयात न्यायालयाने सुनावलेली आजन्म कारावासाची शिक्षा टाळण्याकरीता आरोपी हा मागील 20 वर्षा पासुन त्याचे अस्तित्व लपविण्याकरीता वेगवेगळया ठिकाणी राहत असे.
स्थानिक गुन्हे शाखेकडील सहा.पोलीस निरीक्षक धनंजय पोरे आणि पोउपनि सुबोध जमदाडे यांचे पथकाने आरोपी याची गुप्त् बातमीदारा मार्फत माहिती प्राप्त् केली. प्राप्त् माहिती प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन्ही पथकांनी दिनांक 05/06/2023 रोजी सिध्दापूर ता. मंगळवेढा येथे सापळा रचुन आरोपीचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. आरोपीत यास सत्र न्यायालय सोलापूर यांचे न्यायालयात हजर केला असता, सत्र न्यायालय सोलापूर यांनी सदर आरोपीस आजन्म कारवासाची शिक्षा भोगण्याकरीता कारागृहात रवानगी केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण शिरीष सरदेशपांडे, आणि अपर पोलीस अधीक्षक, हिम्मत जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुहास जगताप स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण, यांचे नेत्तृत्वाखाली सहा.पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, पोउपनि, सुबोध जमदाडे, श्रेणी पोसई राजेश गायकवाड, सपोफौ श्रीकांत गायकवाड, सपोफौ शिवाजी घोळवे, पोहवा परशुराम शिंदे, सलीम बागवान, हरिदास पांढरे, आबासाहेब मुंढे, पोना रवी माने, मपोना ज्योती काळे, पोकॉ अजय वाघमारे, समर्थ गाजरे, सुरज रामगुडे, यश देवकते, चापोहवा प्रमोद माने, चापोशि दिलीप थोरात, यांनी पार पाडली आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...