सोलापूर – ओडिशाच्या बालासोर येथे रेल्वे अपघात होऊन जवळपास तीनशे प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत, सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष चेतन नरोटे आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रेल्वे अपघातातील सर्व मृतांना मेणबत्ती पेटवुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
ओडिशातील बालासोर येथे झालेला रेल्वे अपघात शतकातील मोठा अपघात आहे, आपले प्रचारमंत्री नरेंद्र मोदी कामापेक्षा जास्त प्रचारात व्यस्त असतात देशात कुठेही रेल्वे ला झेंडे दाखवायचे असेल तर पंतप्रधान मोदीच दाखवतात मग अपघाताची जबाबदारीही मोदी यांनी घ्यावी, जवळपास तीनशे नागरिकांचा मृत्यु झाला, अपघात रोखणारा मोठ्ठा गाजावाज़ा केलेला महाकवच कोठे गेले. यापूर्वी रेल्वे अपघात झाल्यानंतर अनेक रेल्वे मंत्र्यानी राजीनामा दिला होता. बालासोरचा रेल्वे अपघात भयंकर आहे, प्रचंड जिवितहानी झाली आहे, हजारो जखमी झाले. त्याची जबाबदारी घेऊन रेल्वेमंत्र्यांनी ताबड़तोब राजीनामा दिला पाहिजे, असे चेतन नरोटे यांनी सांगितले.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...