सोलापूर – माळशिरस येथून ०१ देशी बनावटीचे गावठी पिस्टल व ०२ जिवंत काडतूस जवळ बाळगणा-या इसमास जेरबंद करून त्याचेकडून एकूण ५०,४०० रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सांगली आणि कोल्हापूर येथे मागील काही दिवसापूर्वी अग्निशस्त्राचा वापर करून घडलेल्या गंभीर स्वरूपाचे गुन्हयांचे अनुषंगाने आणि सोलापूर ग्रामीण जिल्हयातील आगामी पंढरपूर येथील आषाढीवारी निमित्त स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, सुहास जगताप यांनी सोलापूर ग्रामीण जिल्हयातील अवैध अग्निशस्त्राबाबत मोहिम राबविणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके आणि त्यांचे पथकास गोपनीय माहिती काढून कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने सपोनि शशिकांत शेळके व त्यांचे पथक अवैध अग्निशस्त्राबाबत कारवाई करणेकामी जिल्हयातील गोपनीय बातमीदार यांना सतर्क केले असता, त्यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशिर बातमी मिळाली की, मौजे माळशिरस येथे राहणारा रेकॉर्डवरील एक इसम हा अवैध अग्निशस्त्र व जिवंत काडतूस स्वत:च्या कब्जात बाळगून माळशिरस येथील परिसरात वावरत आहे. अशी बातमी मिळाल्यानंतर सपोनि शशिकांत शेळके यांनी सदरची बातमी ही स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुहास जगताप यांना कळविली असता, त्यांनी त्यांना तात्काळ कारवाई करणेबाबत आदेशित केले.
त्यानंतर सपोनि शशिकांत शेळके आणि त्यांचे पथक दोन पंचासह माळशिरस येथे आल्यानंतर त्यांना सदरचा इसम हा माळशिरस येथील पालखीतळ येथे एका झाडाखाली अवैध अग्निशस्त्रासह उभा असल्याबाबतची बातमी मिळाली, त्यानंतर त्यांनी तात्काळ सदर ठिकाणी जावून खात्री केली असता, सदर ठिकाणी बातमी प्रमाणे एक इसम हा झाडाखाली थांबलेला दिसला, त्यास ताब्यात घेवून अंगझडती घेतली असता त्याचे कंबरेच्या डाव्या बाजूस एक देशी बनावटीचा गावठी पिस्टल आणि त्या गावठी पिस्टलच्या मॅग्झिनमध्ये ०२ जिवंत काडतूसे मिळून आल्याने त्यासा घेवून त्याचे विरुध्द माळशिरस पोलीस ठाणे येथे गुरनं ३२८/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम १९५९ चे कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि शशिकांत शेळके हे स्वतः करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके, सफौ ख्वाजा मुजावर, पोहेकॉ धनराज गाडे, प्रकाश कारटकर, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक पोना समीर शेख यांनी बजावली आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...
Aur best kro