सोलापूर – आरोग्य आणि फिटनेसबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी, एनटीपीसी सोलापूर येथे 21 जून 2023 रोजी सिद्धेश्वर विद्युत नगर टाऊनशिपच्या कम्युनिटी सेंटरमध्ये 9वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
या वर्षाची थीम “वसुधैव कुटुंबकम साठी योग”, म्हणजेच ‘एक विश्व-एक कुटुंब म्हणून सर्वांच्या कल्याणासाठी योग’ याचे सर्वांकडून स्वागत करण्यात आले.
विजय गोयल, CGM, एनटीपीसी सोलापूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी तपन कुमार बंदोपाध्याय, GM(O&M), बिपुल कुमार मुखोपाध्याय, GM (FM), परिमल कुमार मिश्रा, GM (ऑपरेशन), संगीता गोयल, अध्यक्षा, सृजना महिला मंडळ, कर्मचारी, कुटुंबातील सदस्य, CISF जवान , लेडीज क्लबचे वरिष्ठ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने दिलेल्या सामाईक योग प्रोटोकॉलनुसार योग साधने, आसन आणि प्राणायाम योग साधना करण्यासाठी सर्वजण एकत्र जमले होते.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...