पुणे – वेल्हे येथील दर्शना पवार खून प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलीसांनी उलगडा करून आरोपीला जेरबंद केले, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर ऊर्फ राहुल दत्तात्रय हंडोरे (वय 28 वर्षे, रा. हिंगणे होम कॉलनी, दत्तमंदीराजवळ, कर्वेनगर, पुणे, मुळ रा. मु.पो. शहा, ता. सिन्नर, जि. नाशिक) हा गुन्हयातील मुख्य संशयित असल्याचे आणि तो गुन्हा घडल्यापासून पळून गेला असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावरून तपास पथकांनी संशयित राहुल दत्तात्रय हांडोरे याचा शोध घेऊन अंधेरी रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेतले. राहुलने गुन्हा केल्याचे कबुल केला आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास ते गडाकडे निघाले होते. माघारी येताना राहूल एकटाच आला होता. खून केल्यानंतर तो बंगालसह महाराष्ट्रच्या विविध ठिकाणी रेल्वेने फिरत होता.
राजगडाच्या पायथ्याशी दर्शना पवारचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळलो होता, त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. शवविच्छेदन अहवालातून तिचा खून झाला असल्याचे समोर आले होते. वेल्हे पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. दरम्यान दर्शनाचा मित्र संशयित राहूल हंडोरेला अंधेरी रेल्वे स्टेशनवरून अटक करण्यात आली आहे, प्राथमिक माहितीनुसार, लग्नाला नकार दिला म्हणून राहुलने दर्शनाचा खून केल्याचा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे, राहुलला अटक केल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी पत्रकार परिषद घेत दर्शना पवार हत्या प्रकरणाची माहिती दिली.
एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरी आल्याच्या निमित्ताने पुण्यातील स्पॉट लाईट अकादमीमध्ये दर्शनाचा सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी दर्शनाने उत्तम भाषणही केले होते. जेव्हा आपण यशस्वी होतो ना, तेव्हा त्यामागे खूप लोकांची मेहनत असते अशी प्रतिक्रिया तिने भाषणांत दिली होती.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...