सोलापूर – बकरी ईद निमित्त शहरातील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी एकत्र आले असताना एक खळबळजनक घटना घडली, सोलापूर शहरातील होटगी रोड वरील शाही आलमगिर ईदगाह मैदानासमोर फुगेवाला पाकिस्तान जिंदाबाद, आय लव पाकिस्तान पाकिस्तानचा झेंडा असलेली हिरवे आणि विविध रंगाचे फुगे विक्री करत होता. अनेक मुस्लिम बांधव हे आपल्या लहान मुलांना घेऊन नमाज पठणसाठी ईदगाह मैदानात जाताना ही बाब लक्षात आली. त्याकडे असलेली फुगे ही पाकिस्तान देशाची होती, त्यावर पाकिस्तान लव असे लिहिले होते. सजग आणि जागरूक मुस्लिम बांधवानी ताबडतोब तैनात असलेल्या पोलिसांना माहिती दिली आणि फुगे वाल्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. अजय पवार (रा पारधी वस्ती,विजापूर रोड ,सोलापूर) असे ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्यात संशयित फुगेवाल्याकडून पोलीस अधिक चौकशी करत आहेत. एमआयएमचे नेते रियाज सय्यद यांनी ताबडतोब विजापूर नाका पोलीस ठाणे गाठून निवेदन दिले आहे, हे एक षडयंत्र असून मुस्लिम समाजाला बदनाम करण्यासाठी हे कारस्थान सुरू असल्याची माहिती रियाज सय्यद यांनी दिली आहे.
रियाज सय्यद यांनी याची तात्काळ गंभीर दखल घेत पोलिस प्रशासनकडे निवेदन दिले आहे. मुस्लिम धर्मीयांच्या सणा दिवशी ईदगाह मैदानावर पाकिस्तान समर्थनाचे फुगे विक्री केल्याची बाब गंभीर आहे, हे फुगे विक्री करणारे सर्वसामान्य आणि गोरगरीब आहेत, यामागे षडयंत्र रचणारे कोण आहेत, याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करत, पोलीस निरीक्षक विजापूर नाका यांच्याकडे मागणी केली आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...