सोलापूर – अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी भागातील कारखान्यांमध्ये एका टॉवेल कारखान्याला आग लागली, यात तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी घडली.
अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीमध्ये एका टॉवेल कारखान्याला बुधवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली, कारखान्याच्या वरच्या बाजूस काही कामगार राहत होते, कारखान्यातील टॉवेल कच्चामाल आणि कागदी पुट्ट्याला मोठी आग लागल्याने कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. स्वयंपाक करत असताना गॅस लिकेज झाल्यामुळे कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती महापालिकेच्या अग्निशामक विभागाने दिली आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस आणि महापालिकेचे यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे.
चंदन काटा येथे भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी…
सोलापूर हैदराबाद रोड येथील चंदन काटा येथे दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे, या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू...