सोलापूर – मराठ्यांना आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सराटी आंतरवाली, जालना येथील गावकरी बेमुदत आमरण उपोषणास बसलेले आहेत. सदरचे आंदोलन संवैधानिक पध्दतीने आणि शांततेत चालू असतांनाही पोलिसांनी बळाचा गैरवापर करून सदरचे आंदोलन चिरडून टाकण्याच्या दृष्टहेतूने आंदोलनास बसलेल्या महिला-पुरुषांसह आबाल-वृध्दावर अंधाधुंद लाठीचार्ज करून गोळीबारही केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबार आणि लाठीचार्जमुळे 15 ते 20 आंदोलनकर्ते गंभीर जखमी झालेले आहेत. त्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रीय छावाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष गणेश मोरे, यांच्यावतीने दि. 04 सप्टेंबर 2023 रोजी, तेरा मैल, सोलापूर-विजापूर हायवे, दक्षिण सोलापूर येथे रास्ता रोको, चक्का जाम आंदोलन करण्यात आला. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
जालना पोलिसांनी निष्पाप लोकांवर केलेल्या लाठीचार्जमुळे संपूर्ण महाराष्ट्रात रोष उत्पन्न होवून राज्यातील सामाजिक जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज आणि गोळीबार केल्याप्रकरणी जालनाचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना तातडीने निलंबित करून ह्या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करावी आणि मराठा महिलाचा अंगावर हात टाकून, त्याचा विनयभंग केल्याप्रकरणी एसपी तुषार यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचेवर विनयभंगाचे गुन्हे दाखल करावेत आणि मराठा जातीला कुणबी तत्सम जात घोषित करून सरसकट मराठा जातीचा राज्य ओबीसी यादीत समावेश करावा, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय छावा संघटनेच्यावतीने तेरा मैल, सोलापूर विजापूर हायवे, दक्षिण सोलापूर येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...