सोलापूरात मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जोडभावी पेठ परिसरात एक धक्कादायक घटना घडली. नाल्यात वाहून गेल्याने एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. सलाम दलाल असे मृत तरुणाचे नाव आहे. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास मुसळधार पावसात घरी परत येत असताना कुंभार वेस परिसरातील नाल्याजवळ गाडी घसरल्याने मृत तरुण कोसळला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने प्रवाहासोबत तो वाहून गेला आणि त्यातच त्याचा मृत्यू झालंय.
मृत सलाम दलाल याला एकूण 3 मुलं असून अवघ्या ३ महिन्याचा बाळ आहे, तर 5 आणि 3 वर्षाचे दोन मुलं ही अनाथ झाली आहेत. मुंबईत झालेल्या २६/११च्या वेळेस वडील साबीर दलाल यांना गोळी लागल्याने जखमी झाले होते, काही महिन्यापूर्वी त्यांचा ही मृत्यू झाला होता. आता कुटुंबातील कर्ता असलेल्या सलाम याचा ही मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातं आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...