पुणे – शहराच्या वेगवेगळ्या भागातून प्राणघातक हल्ल्याचे, कोयताधारी टोळक्याच्या धुडगूस घालणाऱ्या घटना घडत असतानाच, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पुणे शहर खुनाच्या घटनेने हादरले, खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोपोडी परिसरात अल्पवयीन मुलांनी एका तरुणाचा निर्घृणपणे खून केला, भर दिवसा घडलेल्या या घटनेने पुणे शहर पुन्हा एकदा हादरले आहे.
धीरज प्रदीप भोसले (वय २२, बोपोडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, खून केल्यानंतर दोन्ही अल्पवयीन मुले पसार झाली होती. दरम्यान खडकी पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मयत धीरज याच्यावर यापूर्वी एक गुन्हा दाखल होता. तर मारेकरी दोघेही अल्पवयीन आहेत. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्राथमिक माहितीनुसार, मयत धीरज याचे आरोपीच्या भावासोबत भांडण झाले होते. याचाच राग आरोपींच्या मनात होता. याच रागातून दोघांनी आज दुपारच्या सुमारास धीरज याला बोपोडी परिसरातील रस्त्यात गाठले. त्यानंतर तीक्ष्ण पालघनने धीरज याच्यावर सपासप वार करण्यात सुरूवात केली. भरदुपारी हा प्रकार रस्त्यावरच सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. तरीही दोन्ही अल्पवयीन मुलांनी सर्वांसमोर धीरज याच्यावर सपासप वारकरून निघृण केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...