सोलापुर – राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्रीच्या ठिकाणांवर सातत्याने धाडी टाकण्यात येत असून बुधवारी निरीक्षक नंदकुमार जाधव ब विभाग यांना सोलापूर-हैदराबाद रोडवर रिक्षातून हातभट्टी दारूची वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक खबर मिळाली, त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या पथकासह सोलापूर हैदराबाद रोडवर उजव्या बाजूस सोन्या मारुती पेट्रोल पंपासमोर सापळा रचून पाळत ठेवली असता अभिषेक बाळू राठोड, वय 21 वर्षे, राहणार मुळेगाव तांडा हा इसम ऑटोरिक्षा मधून रबरी ट्यूबमधून साडेचारशे लिटर हातभट्टी दारुची वाहतूक करीत असल्याचे आढळून आले, त्याच्या ताब्यातून तेविस हजार रुपये किमतीच्या हातभट्टी दारूसह एकूण एक लाख त्रेसष्ट हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नितीन धार्मिक आणि उपअधीक्षक एस आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई निरीक्षक नंदकुमार जाधव, दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट आणि वाहनचालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडली.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...