सोलापूर – आगामी लोकसभा निवडणुकची प्रक्रिया शांततेत पार पाडुन निवडणुकीच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये या अनुषंगाने सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या हद्दीतील गुळवंची, सेवालालनगर, भानुदास तांडा आणि वडजी या परिसरात चोरून चालणा-या अवैध हातभट्टी दारूच्या भट्टया उध्दवस्त करण्याच्या अनुषंगाने, सोलापूर तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी जानेवारी 2024 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत विशेष मोहीम राबवुन पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांचेसह चोरून अवैधरित्या चालणा-या दारूच्या हातभट्टया वर छापे टाकुन कारवाई करण्यात आली आहे. अवैधरित्या चालणा-या देशी दारूच्या हातभट्टयावर टाकलेल्या छापा कारवाईत एकूण 16 लाख 64 हजार रूपये 200 रूपये किंमतीचे त्यामध्ये 41 हजार 300 लिटर गुळमिश्रीत रसायन, 406 प्लॅस्टीक बॅरेल मध्ये भरून ठेवलेली गावंठी हातभट्टी दारू तयार करणे करीता लागणारे साहित्य तसेच अवैधरित्या दारूच्या हातभट्टया उध्दवस्त करून, प्लॅस्टीक बॅरेल जागीच फोडुन त्यातील गुळमिश्रीत रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले आहे. गुळवंची, सेवालालनगर, भानुदासतांडा व वडजी या ठिकाणी चोरून अवैध दारूच्या हातभट्टया उध्दवस्त केलेल्या ठिकाणी एकूण 21 इसमा विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्या कलम 65 फ अन्वये 21 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दाखल करण्यात आलेल्या गुन्हयाच्या तपास सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार याचेकडुन होत आहे.
सदरची छापा कारवाई शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर, यांचे मार्गदर्शनाखाली नामदेव शिंदे, पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी पार पाडली आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...