सोलापूर – आज अक्कलकोट महामार्गांवर शहर वाहतूक शाखेच्या सतर्कत्यामुळे एक मोठा अनर्थ टाळला आहे, या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सोलापूर ते अक्कलकोट महामार्गांवर सोलापूरच्या दिशेने येणारा बल्कर आडवा तिडवा येत असताना शहर वाहतूक शाखेच्या कर्मचारीच्या निदर्शनास आला, शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी त्या बल्करला थांबण्याचा इशारा केला मात्र बल्कर न थांबता तसेच निघून गेला, शहर वाहतूक शाखेने सिनेस्टाईल पाठलाग करून त्या सिमेंट बल्करला बोरामणी नाका येथे अडवले, शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी त्या बल्कर चालकची तपासणी केली असता, बल्कर चालक हा मध्यप्रशन करून बल्कर चालवित असल्याचे निदर्शनास आले, शहर वाहतूक शाखेने सिमेंट बल्कर चालकास ताब्यात घेतले असून बल्कर चालकावर पुढील कारवाई सुरु आहे, आणि सदरचे वाहन API राजगुरू यांच्या ताब्यात दिली आहे.
शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी पोलीस शिपाई प्रवीण माळगे आणि संतोष साळूखे यांच्या सतर्कतेमुळे पुढील होणारा अनर्थ टाळला आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...