सोलापूर शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यास महापालिका प्रशासन असमर्थ ठरले आहे, दररोज पाणी देण्याचे क्षमता असून देखील नियोजना अभावी ७ ते ८ दिवस पाणी सोडत नाही, याबाबत सोलापुरातील नागरिक आणि विविध संघटनानी अनेक वेळा आंदोलनाद्वारे प्रशासनात विचारले तरीहीपाणीपुरवठा सुरळीत होत नाही यामुळे सोलापूरकर वासियांना होणाऱ्या त्रास कमी व्हावा आणि मनपा प्रशासनास जाग यावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने श्री सत्यनारायण महापूजा घालून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले.
सोलापूर महानगरपालिका प्रशासनाचा शहराला पाणीपुरवठा सुरळीत आणि नियमित करावे या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहर प्रमुख विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, महिला आघाडी जिल्हा संघटिका प्रियाताई बसवंती, उपजिल्हाप्रमुख संतोष केंगनाळकर, शहर संघटक अतुल भवर, विभागीय संघटक भैय्या धाराशिवकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री सत्यनारायण महापूजा करण्यात आले.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...