सोलापूर – Me Vs Me हा रॅप सॉन्ग गिरीष उर्फ MGM यांनी लिहलेला असून त्याचे संगीत, प्रोडक्शन आणि गायनसुध्दा देखील गिरीष यांनी केलेले आहे. Me Vs Me या अल्बमध्ये सध्याच्या तरुण पिढीला Motivation देण्याचा हेतू असून या रॅप सॉन्ग द्वारे सोलापूर Hip-Hop ला Represent करण्याचा विडा घेतलेला आहे.
आज कालची तरुण पिढी मावा, तंबाखूचे व्यसन करताना दिसत आहेत आणि स्वतःच्या प्रगतीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत, दुसऱ्याकडून इर्ष्याची भावना ठेवत चुकीच्या मार्गावर पाऊल ठेवतात, सदर Me vs Me या गाण्याच्या माध्यमातून माणूस स्वतःशी लढा देणे हे किती महत्वाचे आहे याचे बोध सांगितले आहे, अशी आशा आहे की सदर गाणा हे तरुण पिढीला नक्की आवडेल अशा Modern संगीताचा यात वापर केलेला आहे.
Me Vs Me चा Music Video ‘MD Arts’ द्वारे शुट आणि एडीट केलेला आहे. सदर गाणा हे रविवार दिनांक २५/०६/२०२३ रोजी MGM Solapur या You Tube चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे.
सदर गाण सर्वांनी आवर्जुन पहावे आणि आपल्या मित्र – मैत्रणींना देखील दाखवावे अशी विनंती गिरीष चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...
Nice