सोलापूर – डान्स बार मधील पोरींसोबत नाचलेले व्हिडिओ व्हायरल करतो अशी धमकी देत तडीपार आरोपीने त्याच्या साथीदारा समवेत प्राध्यापकाला दोन लाखाची खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २५ मार्च २०२४ ते ११ एप्रिल २०२४ दरम्यान शासकीय विश्रामग्रह येथे घडली आहे.
या प्रकरणी प्रवीण भानुदास कांबळे यांनी सदर बजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तडीपार आरोपी अनमोल केवटे आणि त्याचे साथीदार महेश कांबळे, आसिफ शेख, नागेश बिराजदार, बंदेनवाज शेख (सर्व रा. मंद्रूप) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रवीण भानुदास कांबळे यांना ११ एप्रिल २०२४ रोजी सोलापूरच्या शासकीय विश्रमग्रह आणि मंद्रूप महाविद्यालय येथे जाऊन फिर्यादीच्या संमतीशिवाय काढलेले डान्सबार मधील व्हिडीओच्या बदल्यात वरील आरोपीने दोन लाखाची मागणी केली. पैसे नाही दिल्यास आमच्याकडे डान्स बार मधील पोरी सोबत नाचतानाचे फोटो आणि व्हिडिओ काढलेले आहेत ते आम्ही व्हायरल करू, अशी धमकी दिली. तसेच हे व्हिडिओ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना पाठवू अशी धमकी देत, मध्यस्थी मार्फत फिर्यादीस पैशाची मागणी करत होते. तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल करण्याची धमकी देत होते, असे फिर्यादीत नमूद आहे. या बाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजीवनी व्हट्टे हे करीत आहेत.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...