सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव परिसरात झालेल्या पावसामुळे ओढ्याच्या पूलावर आलेल्या पाण्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर एका दुचाकीवर पूल ओलांडत असलेले तिघे जण पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले. पाण्याचा अंदाज आणि रात्रीचा अंधार यामुळे सदरची घटना घडली आहे. यामध्ये ज्ञानेश्वर संभाजी कदम, बबन संदीपान जाधव आणि महादेव रेड्डी अशी त्यांची नावे असून त्यापैकी बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांना पुराच्या पाण्याबरोबर वाहून जात असताना ओढा प्रवाहातील झाडांना पकडून स्वतःला वाचविण्यात यश आले तर ज्ञानेश्वर कदम सकाळपर्यंत मिळून आला नाही. दरम्यान सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन करत युवकाची दुचाकी शोधून काढली आहे मात्र अद्यापही युवक बेपत्ता असल्याचे दिसून आले. दरम्यान मुळे आणि कासेगावला जोडणारा ओढ्यावरील पूलाचे उंची वाढवण्याचे काम अद्यापही अर्धवटच आहे, गतवर्षी देखील अशाच प्रकारे पुलावरून पाणी वाहिले होते मात्र त्यावेळी कोणतीही दुर्घटना घडली नव्हती, यंदाच्या वर्षी मात्र एक युवक वाहून गेल्याने कासेगावसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी ओढ्याजवळ येऊन थांबले होते. सदर घटनेवर ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना संबंधित ठेकेदार अभियंता आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, यांच्या हलगर्जीपणामुळे सदरची घटना घडली असून संबंधितावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...