सोलापूर – किरण देविदास म्हेत्रे वय ४६ वर्षे, पद- पोलीस हवालदार, नेमणुक विजापूर नाका, पोलीस ठाणे आणि खाजगी इसम रोहित नागेश गवड वय. ३३ वर्षे रा. दक्षिण कसबा सोलापूर, यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रथम २५,०००/- रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती १००००/- रुपये लाचेची रक्कम स्विकारलयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने जेलरोड पोलीस ठाणे सोलापूर, येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पो.ह. किरण म्हेत्रे, यांनी तक्रारदार यांचे आणि त्यांचा मामे भाऊ यांचेविरुध्द विजापूर नाका पोलीस ठाणे येथे आय.पी.सी. कलम ३२५ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे सांगुन सदर गुन्हयात तक्रारदार यांना अटक न करता, फक्त चॅप्टर केस करुन तक्रारदार यांना सोडून देण्यासाठी खाजगी इसम रोहित गवड यांचे करवी तक्रारदार यांचेकडे २५०००/- रुपये लाचेची मागणी केली, तर तडजोडी अंती १००००/- रुपये लाच रक्कम पो.ह. किरण म्हेत्रे यांनी खाजगी इसम रोहित गवड यांचे हस्ते स्विकारली असल्याचे मान्य केले, सदरची लाचेची रक्कम स्वीकारल्या बद्दल दोन्ही आरोपीस ताब्यात घेवुन, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७, आणि ७अ प्रमाणे जेलरोड पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सदरची कामगिरी अमोल तांबे, पोलीस अधीक्षक ला.प्र.वि. पुणे डॉ. शीतल जानवे/खराडे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली, गणेश कुंभार पोलीस उपअधीक्षक, उमांकांत महाडिक पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. सोलापूर यांच्या साहाय्याने पोलीस अंमलदार पो.ह. शिरीषकुमार सोनवणे, श्रीराम घुगे, अतुल घाडगे पो.शि. रवि हाटखिळे, चालक राहुल गायकवाड यांनी सापळा रचुन यशस्वीरित्या पार पाडली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागा तर्फे सोलापूर जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणा-या लोकसेवकाबद्दल अथवा त्याच्यावतीने लाच मागणा-या खाजगी व्यक्तींबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे टोल फ्री क्रमांक १०६४ अगर दुरध्वनी क्रमांक ०२१७-२३१२६६८ वर संपर्क साधावा.
दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी
सोलापूर - दिवाळीची खरेदी करून गावी जात असताना तुळजापूर रोडवरील रूपाभवानी सर्व्हिस रोडवर समोरून येणाऱ्या मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाच्या पाठीमागे...