सोलपूर – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापुरात आगमन झाले, सोलापूर विमानतळावर पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यांचे स्वागत केले, यावेळी सोलापूर जिल्ह्यातील खासदार, आमदार, शासकीय अधिकारी, आणि भाजपाचे लोकप्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास विमानतळावर दाखल झाले, फडणवीसांच्या हस्ते सात रस्ता येथील नियोजन भवनच्या शेजारी असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार असून. त्या नंतर ते नियोजन भवनात जिल्हास्तरीय आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर दुपारी सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या आयोजित करण्यात आलेल्या विकासकामांचे फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण होणार आहे.
दरम्यान, सायंकाळी ४ वाजता हेरिटेज लॉन्स येथे आगमन होणार असून, त्यांच्या उपस्थितीत जिल्हा भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक लोकप्रतिनिधी भाजपात प्रवेश करणार आहेत.
एनटीपीसी सोलापूरच्या वतीने जिल्हा परिषद मराठी शाळा, होटगी स्टेशन येथे नवीन वर्गखोल्यांचे उद्घाटन
सोलापूर - एनटीपीसी सोलापूरने आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) प्रयत्नांचा एक भाग म्हणून होटगी स्टेशन येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत...