सोलापूर – पोलीस आमच ऐकून घेतच नाहीत. समोरच्या पार्टीकडूनच चुकीच्या फिर्यादी घेतात आणि आम्हाला छळतात असं सांगत, पत्रकार परिषदेत एका कुटुंबातील महिला, वृद्ध आणि तरुणांनी अक्षरशः टाहो फोडला.
मिल्लत नगर विजापूर रोड येथे राहणाऱ्या मुस्कान बापूताज पटेल या आपल्या पती, सासु आणि लहान मुलांसह पत्रकार परिषदेसाठी आल्या. त्या म्हणाल्या, १४ जूनला दुपारी दोनच्या सुमारास माझ्या घरी समदानी मत्तेखाने, अंजुम मत्तेखाने, वाजीदा आणि तोफिक पीरजादे त्यांच्या घरात घुसले दीर मुसद्दीक कुठे आहे? त्यांनी आमचे पैसे घेतले पण परत दिले नाहीत असे म्हणून बेदम मारहाण सुरू केली. आपण गरोदर आहोत त्रास देऊ नका. दिराचा आणि आमचा संबंध नाही ते गुलबर्गा येथे असतात असं सांगितलं पण कोणीही ऐकलं नाही. आम्हा सर्वांना बेदम मारहाण केली. नंतर पोलीस आले असता किरकोळ वाद आहे असं त्यांनीच सांगितलं. पोलीस गेल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मुस्कानच्या नवऱ्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली आहे. मी आणि माझे पती फिर्याद देण्यास गेलो असता वैद्यकीय तपासणी करून या मग पाहू असं सांगून तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. हे सांगत असताना मुस्कान त्यांच्या सासू आणि पती पत्रकारांसमोर रडत होते. हा गुन्हा विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे.
एनटीपीसी सोलापूरच्या वतीने जिल्हा परिषद मराठी शाळा, होटगी स्टेशन येथे नवीन वर्गखोल्यांचे उद्घाटन
सोलापूर - एनटीपीसी सोलापूरने आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) प्रयत्नांचा एक भाग म्हणून होटगी स्टेशन येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत...