सोलापूर – आगामी लोकसभा निवडणुकची प्रक्रिया शांततेत पार पाडुन निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये आणि कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी या अनुषंगाने सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या हद्दीतील भानुदास तांडा, सेवालालनगर, बक्षीहिप्परगा, गुळवंची व मुळेगाव तांडा या परिसरात चोरून चालणा-या अवैध हातभट्टी दारूच्या भट्टया उध्दवस्त करून संबंधीत इसमा विरूध्द कारवाई करणे करीता सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी दिनांक 07 मार्च
2024 ते 19 मार्च 2024 या कालावधीत विशेष मोहीम राबवुन चोरून अवैधरित्या चालणा-या दारूच्या हातभट्टया आणि हातभट्टी दारू विक्री करणा-या इसमा विरूध्द छापे टाकुन कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई मध्ये चोरून अवैधरित्या गावंठी देशी दारूच्या हातभट्टीच्या ठिकाणी टाकलेल्या छापा कारवाईत एकूण 5 लाख 42 हजार रूपये 600 रूपये किंमतीचे त्यामध्ये 15 हजार 600 लिटर गुळमिश्रीत रसायन, प्लॅस्टीक बॅरेल मध्ये भरून ठेवलेली गावंठी हातभट्टी दारू तयार करणे करीता लागणारे साहित्यासह चोरून अवैधरित्या दारूच्या हातभट्टया उध्दवस्त करून 88 प्लॅस्टीक आणि 2 लोखंडी बॅरेल जागीच फोडुन त्यामधील गुळमिश्रीत रसायन जागेवरच नष्ट करून एकूण 10 इसमा विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अन्वये 6 गुन्हे दाखल केले आहेत.
तसेच मौजे मुळेगाव तांडा, समशापुर, बक्षीहिप्परगा आणि सेवालालनगर तांडा या ठिकाणी चोरून अवैधरित्या हातभट्टी दारूची विक्री करणा-या 4 इसमा विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्या प्रमाणे 4 गुन्हे दाखल करून 2405 लिटर हातभट्टी दारू जप्त करून एकूण 1 लाख 45 हजार 450 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
एनटीपीसी सोलापूरच्या वतीने जिल्हा परिषद मराठी शाळा, होटगी स्टेशन येथे नवीन वर्गखोल्यांचे उद्घाटन
सोलापूर - एनटीपीसी सोलापूरने आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) प्रयत्नांचा एक भाग म्हणून होटगी स्टेशन येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत...