सोलापूर शहरातील २०२४ मध्ये दाखल असलेल्या घरफोडी, वाहन चोरी, जबरी चोरी आणि इतर चोरीचे असे ३२२ गुन्ह्यापैकी १३२ गुन्हे उघडकीस आणत ४३ लाख २६ हजार ९७३ रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषद दरम्यान दिली.
शहर पोलिसांनी मे २o२४ महिन्यामध्ये घरफोडीचे ६१ दाखल गुन्ह्यापैकी ४१ गुन्हे, जबरी चोरीतील ११ दाखल गुन्ह्यापैकी ९ गुन्हे तसेच वाहन चोरीचे १६३ दाखल गुन्ह्यापैकी ८३ गुन्हे आणि इतर चोरीचे ८७ गुन्ह्यापैकी ५७ गुन्हे उघडकीस आणण्यास शहर पोलिसांना यश आले आहे. याची टक्केवारी ५९ टक्के आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे, शहरातील नागरिकांनी चोरी बाबतच्या घटनांची माहिती देऊन पोलिसांना सहकार्य करावे जेणेकरून चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांना मदत होईल असे आवाहन पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी केले आहे.
सराईत गुन्हेगारांनाही बेड्या ठोकल्या असून, एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे पोलिसांनी कर्नाटक येथील सराईत गुन्हेगार शाहू उर्फ शरणाप्पा सिद्धाप्पा काळे (वय ३६) यास अटक करून घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आणून २ लाख ५८ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केले आहे. तर विजापूर नाका पोलीस ठाणे पोलिसांनी कल्याण येथील सराईत गुन्हेगार सॅमसंग रुबीन डॅनियल (वय २५) यास बेड्या ठोकत घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत. गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील ज्वेलर्स दुकानातून चोरी करणाऱ्या तीन बुरखादारी महिलांना ताब्यात घेऊन चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणले आहेत, तसेच सदर बाजार पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या चार आरोपींना ताब्यात घेऊन तहसीलदार कार्यालय येथून चोरीस गेलेले सात लाख रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर आणि दोन ट्रॉली हस्तगत केले आहेत.
चंदन काटा येथे भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी…
सोलापूर हैदराबाद रोड येथील चंदन काटा येथे दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे, या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू...