सोलापूर – दिनांक ०९ जून २०२४ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर भुईंजे गावाजवळ टेंभुर्णी वरुन बैरागवाडीला जाताना दुचाकी क्रमांक MH 45 P 8821 रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला धडकून झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा डोक्याला मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला, सदर अपघातात मृत्यू झालेल्या पुरुषाला वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेतून डॉ. गोरख लोंढे आणि रुग्णवाहिका चालक सागर फाटे यांनी टेंभुर्णी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले, सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिका पथक, मोडनिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पो.उ.नि. बालाजी साळुंखे, आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या अपघातात मृत्यू झालेले व्यक्ती वसंत माळी (माजी सरपंच बैरागवाडी) वय ५५ वर्षे बैरागवाडी ता.माढा येथील रहिवासी आहेत. सदर अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी तांबोळी आणि माळी यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील डॉ गोरख लोंढे यांनी दिली आहे.
चंदन काटा येथे भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी…
सोलापूर हैदराबाद रोड येथील चंदन काटा येथे दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे, या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू...