सोलापूर – शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विजापूर रोडवर एक विचित्र घटना घडली, एक ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टर चालू ठेवून गाडीतील इंधन तपासत होता, अचानकच गिअर पडून ट्रॅक्टर पुढे धावू लागला, तो ट्रॅक्टर दोन तीन दुचाकींना चिरडत पान टपरीत घुसला, सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही, पण चालक मात्र जखमी झाला आहे.
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टरमधील इंधन तपासताना अचानक इंजन पुढे धावू लागले. यावेळी चालक धक्का लागून खाली पडला. यात तो जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेच्यावेळी समोर लावलेल्या तीन दुचाकी ट्रॅक्टरच्या कचाट्यात आल्या. यावेळी ट्रॅक्टर फुटपाथवरील पान टपरीला धडक देत तेथे थांबला. त्यात त्या वाहनांचेही मोठे नुकसान झाले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच विजापूर नाक्याचे पोलिस वामन शेळके व आयटीआयचे बीट मार्शल पवार हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
एनटीपीसी सोलापूरच्या वतीने जिल्हा परिषद मराठी शाळा, होटगी स्टेशन येथे नवीन वर्गखोल्यांचे उद्घाटन
सोलापूर - एनटीपीसी सोलापूरने आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) प्रयत्नांचा एक भाग म्हणून होटगी स्टेशन येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत...