सोलापूर – बांधकाम क्षेत्रातील सर्व समावेशक, प्रातिनिधिक संस्था असलेल्या बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीनं येत्या २३, २४, २५ डिसेंबर रोजी सोलापूरात मॅचकॉन्स या मशिनरी आणि प्रॉपर्टीच्या एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आले आहे.
मशिनरी आणि प्रॉपर्टीच्या एक्झिबिशनचं उद्घाटन २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जुनीमिल कंपाउंड येथे एस. एन. रेड्डी बी.ए.आय. ऑल इंडियाचे प्रेसिडेंट् यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, तर बक्षिस वितरण समारंभ आणि खरेदी करणाऱ्यांना वाहनांची चावी प्रदान कार्यक्रम दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता खासदार जयसिध्देश्वर स्वामी यांच्या हस्ते होणार आहे.
या प्रदर्शनात एकूण ५५ स्टॉल्स असून ३५ स्टॉल्स कन्स्ट्रक्शन मशिनरीचे असतील. तर 20 स्टॉल बिल्डींग प्रॉपर्टी, बैंक आणि इतर स्टॉलसाठी आहेत याठिकाणी खरेदी करणाऱ्यांना विशेष सवलती देण्यात येणार आहेत. सोलापूरातील बांधकाम व्यवसायाशी निगडीत नागरिकांनी या प्रदर्शनास आवश्य भेट द्यावी असं आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आलं.
सदर पत्रकार परिषदेस बी.आय.ए. सोलापूरचे अध्यक्ष युवराज चुंबळकर, अजय अन्नलदास, दत्तात्रय मुळे, राजेश देशमुख, संतोष कलकुटगी, शशिकांत बिराजदार, मल्लेश कावळे, अशोक गांधी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
चंदन काटा येथे भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी…
सोलापूर हैदराबाद रोड येथील चंदन काटा येथे दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे, या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू...
एक्झिबिशन भरल्याबद्दल आभारी आहे