सोलापूर – शहरातील लोकसेवा हायस्कूल येथून आपल्या अवघ्या 3 महिन्यांच्या बाळाला रेगुलर डोस देण्यासाठी निघालेल्या एका आईला कुत्र्याने भर रस्त्यात घेरून जोराने चावा घेतला. सदर महिला कसेबसे आपला जीव वाचून त्या कुत्र्यापासून संरक्षण मिळवली, या नंतर परिसरातील नागरिकांनी राहत एनिमल्स या संस्थेच्या लोकांना बोलावले आणि या कुत्र्याला इंजेक्शन देऊन मारण्यात आला, सोलापूर शहर परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असताना याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार देऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक होत या ठिकाणी त्या महिलेचा चावा घेतलेल्या कुत्र्याचा मृतदेह महानगरपालिकेच्या गेटमधून आयुक्तांच्या केबिनमध्ये नेण्याचा प्रयत्न करण्यात आलं, परंतु यांना पोलिसांनी अडवला आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये झटापटी झाली, याबाबत महापालिकेत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता, सदर ठिकाणी आंदोलन होत असल्याची माहिती मिळताच महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे हे सदर ठिकाणी येऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन सदरचा समस्या वर तोडगा काढून शहरातील इतर मोकाट कुत्र्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, जिल्हा संपर्कप्रमुख जमीर शेख, शहर कार्यकारी अध्यक्ष खालीद मनियार, शहर उपाध्यक्ष मुदसर हुंडेकरी, प्रमोद इंगळे, संभाजी व्हनमाने, शब्बीर शेख, अयाज बांगी आदी उपस्थित होते.
चंदन काटा येथे भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी…
सोलापूर हैदराबाद रोड येथील चंदन काटा येथे दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे, या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू...